कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे कोरोना रुग्ण

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २०१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ५३१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २०१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २२,६५३ झाली आहे. यामध्ये ४३२९  रुग्ण उपचार घेत असून १७,८७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आतापर्यत ४४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या २०१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -२९,  कल्याण पश्चिम-४३,  डोंबिवली पूर्व -७८,  डोंबिवली पश्चिम-३५, मांडा टिटवाळा ९,  तर मोहना येथील  ७ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, २ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, २ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.