कल्याण डोंबिवलीमध्ये २०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २०९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८  जणांचा मृत्यू झाला असून ४४५ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २०९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २१,६०७  झाली आहे. यामध्ये ४७४३ रुग्ण उपचार घेत असून १६,४५२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ४१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या २०९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -३८,  कल्याण पश्चिम-५७,  डोंबिवली पूर्व -५७,  डोंबिवली पश्चिम-४९,  मांडा टिटवाळा ७, तर मोहना येथील एका रुग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच १ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, तर ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.