corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २१२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३५५  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १७५४१ झाली असून जिल्ह्यात ४४७  जणांचा मृत्यू झाला आहे.                

 रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २१२  नवीन रुग्ण सापडले असून ३५५  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १२२ नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात ९९  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २, पनवेल ग्रामीण, खालापूर, रोहा, महाड  येथील १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .    

पनवेल ग्रामीणमध्ये २३ , पेण ८ , खालापूर २१, अलिबाग १८, उरण ११, रोहा ८ , कर्जत ८, माणगाव ७, महाड ४, तळा २ , श्रीवर्धन २ आणि सुधागड मध्ये एक  रुग्ण आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात  ५४०६७  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  १७५४१ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १९१  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १२९२९ जणांनी मात केली असून ३१६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.