रायगड जिल्ह्यात २१३ नवीन कोरोनाचे रुग्ण, १७ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज २१३ नवीन कोरोना रुग्ण आढळले  असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४११ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २४६५५  झाली असून जिल्ह्यात ७४१ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २१३ नवीन रुग्ण सापडले असून ४११ जणांनी कोरोंनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ५९  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ४३ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८ , पेण ३, उरण २ , श्रीवर्धन २ , खालापूऱ आणि माणगाव  येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये १६ , अलिबाग ४४, माणगाव ३०, कर्जत १७ , सुधागड १२ , उरण ११ , रोहा ११ , श्रीवर्धन ९, खालापूर ८, पेण ५ , म्हसळा ३ , महाड ३ , आणि मुरुड मध्ये एक  रुग्ण  आढळला   आहे.  रायगड जिल्ह्यात ८५६४१  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २४६५५   पॉझिटिव्ह आल्या आहेत १४३  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर २०९६२   जणांनी मात केली असून २९५२  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ७४१  जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.