राज्यात २,२९४ नव्या कोरोना रुग्णांची भर, दिवसभरात ५० जणांचा मृत्यू

मंगळवारी राज्यात २,२९४ नवीन काेराेना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद करण्यात आली आहे. तर आज ४,५१६ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,९४,८३९ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत.

मुंबई : मंगळवारी राज्यात २,२९४ नवीन काेराेना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद करण्यात आली आहे. तर आज ४,५१६ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,९४,८३९ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.९८ % एवढे झाले आहेत. राज्यात आज ४८,४०६ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज ५० कोराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू वर्धा-३, यवतमाळ-२, काेल्हापूर-१, नागपूर-१, नांदेड-१, पुणे-१ आणि ठाणे-१ असे आहेत.


दरम्यान, अाजपर्यंत तपासण्यात अालेल्या १,३८,९५,२७७ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १९,९४,९७७ (१४.३६ टक्के)नमुने पाॅिझटिव्ह अाले अाहेत. सध्या राज्यात २,१८,०५८ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून १,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये अाहेत.