corona

मुंबई : राज्यात २४,६१९ नवीन कोरोना(corona) रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११,४५,८४० झाली आहे. राज्यात ३,०१,७५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३१३५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.

राज्यात ३९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४३, ठाणे १०, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा २, मीरा भाईंदर मनपा ७, वसई विरार मनपा ४, रायगड ७, नाशिक १२, अहमदनगर १७, जळगाव २५, पुणे ४३, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर १०, सातारा १८, कोल्हापूर २१, सांगली ४३, औरंगाबाद ८, लातूर ७, उस्मानाबाद ७, नांदेड ११, अमरावती ३, नागपूर ३७ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. दैनंदिन ३९८ मृत्यू आणि पूर्वीचे ७० असे ४६८ मृत्यूंची नोंद आज झाली आहे. नोंद झालेल्या एकूण ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू पुणे मनपा ३६, पुणे ३० , पिंपरी चिंचवड १३ औरंगाबाद ४, कोल्हापूर ४, अहमदनगर ३,नांदेड ३, रायगड २, सांगली २, ठाणे २,अमरावती १, जळगाव १, जालना १, नाशिक १, सातारा १ आणि वर्धा १ असे आहेत.
आज १९,५२२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८,१२,३५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५६,०४,८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११,४५,८४० (२०.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,७०,७४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.