corona

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २७२ नव्या कोरोना रुग्णांची भर झाली असून त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील आजमितीपर्यंत कोरोनाबाधित सापडलेल्या रुग्णाची संख्या २७ हजार ६८४ इतकी आहे. तसेच मृत्यूला सामोरे गेलेल्यांचा आकडा ५९२ वर जाऊन पोहचला आहे . गेल्या २४ तासांत २१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज सापडल्या २७२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक ९१ रुग्ण डोंबिवली पूर्वेकडील परिसरात सापडले. त्या खालोखाल कल्याण पश्चिम -९० ,डोंबिवली पश्चिम – ३३ , कल्याण पूर्व – २९ , मांडाटिटवाळा- १६ , मोहणे आंबिवली – ०७ , पिसवली ०६ असे एकूण कोरोना वाढीत रुग्ण सापडले. त्यामुळे पालिका क्षेत्रातील आजमिती पर्यत कोरोना बाधित सापडलेल्या रुग्णाची संख्या २७ हजार ६८४ इतकी आजमिती पर्यत मृत्यूला सामोरे गेलेल्याचा आकडा ५९२ वर जाऊन पोहचला आहे.पालिकेच्या शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात ३३४३ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून आजमिती पर्यत २३७४९ कोरोना बाधित रुग्णावर उपचार केल्याने ते बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गत चोवीस तासात २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णां पैकी ७६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून आणि १२ रुग्ण हे वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल येथून आणि ०८ रुग्ण बाज आर.आर.रुग्णालय, ०९ रूग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून, ०४ रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कुलमधून, ०२ रूग्ण शास्त्रीनगर रूग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेचे होम आयसोलेशन मधुन बरे झालेले आहेत.