corona

आज राज्यात २,८५४ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. राज्यात आज ६० काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे.

मुंबई : आज राज्यात २,८५४ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. राज्यात आज ६० काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात १,५२६ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १८,०७,८२४ काेराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.३४ % एवढे झाले आहे. आता राज्यातील काेरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,१६,२३६ झाली आहे. राज्यात आज एकूण ५८,०९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात ६० बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूपैकी ३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २१ मृत्यू नागपूर-८, गाेंदिया -४, सांगली-२, ठाणे-२ भंडारा-१, नांदेड-१, नाशिक-१, गडचिराेली-१ व जळगाव- १ असे आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१, ९१९ प्रयाेगशाळा नमुन्यांपैकी १९,१६,२३६ (१५.३९ टक्के)नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६४,१२१ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ३,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.