antibodies can not give you an confirm assurance to avoid reinfection of corona says expert nrvb

मंगळवारी राज्यात २,९३६ नवीन कोरोना(corona patients in maharashtra) रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,७४,४८८ झाली आहे. आज ३,२८२ रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबई: मंगळवारी राज्यात २,९३६ नवीन कोरोना(corona patients in maharashtra) रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,७४,४८८ झाली आहे. आज ३,२८२ रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७१,२७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५१,८९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९ मृत्यू नागपूर-३, बुलढाणा-२ रायगड-१, नािशक-३ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,००,७३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७४,४८८ (१४.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२७,८७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.