राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट पोहोचला ९४.५४ टक्क्यांवर, ३०१८ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज ३,०१८ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. राज्यात आज ६८ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे.

मुंबई : राज्यात आज ३,०१८ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. राज्यात आज ६८ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. साेमवारी राज्यात ५,५७२ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १८,२०, ०२१ काेराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.५४ % एवढे झाले आहे. आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,२५,०६६ झाली आहे. राज्यात आज एकूण ५४, ५३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात ६८ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ६८ मृत्यूपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवठड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू पुणे -६, अमरावती-३, परभणी-२, औरंगाबाद-१ आणि रत्नागिरी -१ असे आहेत.

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२६,००,७५४ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १९,२५,०६६ (१५.२८ टक्के)नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,५६० व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ३,२०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.