महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात, दिवसभरात तब्बल ३१,८५५ नव्या रुग्णांची नोंद

बुधवारी राज्यात ३१,८५५ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५,६४,८८१ झाली आहे.

    मुंबई : बुधवारी राज्यात ३१,८५५ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५,६४,८८१ झाली आहे. आज १५,०९८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,६२,५९३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२१ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,४७,२९९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्युपैकी ५५ मृत्यु हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यु हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू ठाणे-७, नाशिक-३, औरंगाबाद-२, पुणे-१, गाेंदिया-१ व अकाेला-१ असे आहेत.

    सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८७,२५,३०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,६४,८८१ (१३.७० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १२,६८,०९४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,४९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५१९० रुग्ण; रुग्णसंख्येचा विस्फाेट
    दरम्यान मुंबईत दिवसभरात ५१९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३७४६४१ एवढी झाली आहे. तर आज ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११६१० मृत्यूची नोंद करण्यात आली.