कल्याण डोंबिवलीमध्ये ३२९ नवे कोरोना रुग्ण, १० जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून ३८८ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २५,५६०  झाली आहे. यामध्ये ३१२३ रुग्ण उपचार घेत असून २१,९०७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ६७,  कल्याण पश्चिम- ९५,  डोंबिवली पूर्व ९६, डोंबिवली पश्चिम – ५३, मांडा टिटवाळा १२, मोहना ५, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ४ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून,  १२ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण शास्त्री नगर रुग्णालयातून, ८  रुग्ण आसरा फाऊंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.