corona

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज पुन्हा ३२९  नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १०  जणांचा मृत्यू झाला असून ३३६ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२९  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १९,९६७  झाली आहे. यामध्ये ५७७० रुग्ण उपचार घेत असून १३,८४०  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -६६,  कल्याण प.-६५,  डोंबिवली पूर्व -१०७,  डोंबिवली प-५९,  मांडा टिटवाळा ९,  मोहना २० तर पिसवली येथील ३ रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ६ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच १ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.