रायगड जिल्ह्यात आज ३३८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३३८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०६  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या १५२०१ झाली असून जिल्ह्यात ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 रायगड जिल्ह्यातआज कोरोनाचे ३३८ नवीन रुग्ण सापडले असून ५०६  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १५४ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १२१ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५ , पेण ३ ,उरण २ ,खालापूर २ , अलिबाग , श्रीवर्धन आणि पोलादापूर येथील एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३३ , पेण ४० , खालापूर ३५ , अलिबाग २७ , कर्जत १८ , उरण १७ , माणगाव १७ , रोहा १३ , महाड ९ , सुधागड ३ , म्हसळा २ ,  मुरुड  ,श्रीवर्धन  आणि पोलादापूरमध्ये एक रुग्ण आढळला  आहे.  रायगड जिल्ह्यात ४८९४६  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १५२०१ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ४८४  टेस्टचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहेत. कोरोनावर ११५९४  जणांनी मात केली असून ३१८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ४२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.