कोरोना रुग्णांची संख्या गाठतेय रोज नवे उच्चांक, गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद, १६६ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण (corona patients in maharashtra)आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात कोरोना रुग्णांची (corona patients in maharashtra) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता कठोर नियमांची अंमलबजावणी करत आहे. येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी  घोषित करण्यात आली आहे.  तसेच सरकारने अनेक नवे निर्बंध आजपासून लागू केले आहेत. हे नवे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. आज दिवसभरात ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात राज्यात १६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यू दर २.२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,०३,४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    गेल्या २४ तासांमध्ये राज्यामध्ये १४ हजार ५२३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३,१४,५७९ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८६.५८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.