राज्यात ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद ,दिवसभरात ७० जणांचा मृत्यू

गुरुवारी राज्यात ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८१,६२३ झाली आहे.

मुंबई: गुरुवारी राज्यात ३,५७९ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८१,६२३ झाली आहे. आज ३,३०९ रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७७,५८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५२,५५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू अमरावती-४, भंडारा-२, कोल्हापूर-२, नागपूर-२, पुणे-२, बुलढाणा-१, नाशिक-१ व सिंधुदुर्ग-१ असे आहेत.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,२३,२९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८१,६२३ (१४.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९६,८२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २,४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.