रायगड जिल्ह्यामध्ये ३५९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३५९ नवीन रुग्ण आढळले असून १५  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २१९३० झाली असून जिल्ह्यात ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ३५९  नवीन रुग्ण सापडले असून ३८९  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १७६  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १३९  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ७ , उरण ३ , श्रीवर्धन २, पनवेल ग्रामीण, खालापूरआणि महाड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३७ , अलिबाग ३८ , खालापूर ३१, माणगाव २४ , पेण २३ ,महाड २१, उरण १५ , कर्जत १२ , पोलादपूर ५, श्रीवर्धन ५, सुधागड ५ ,रोहा ३ आणि म्हसळ्यामध्ये एक रुग्ण आढळला  आहे.  रायगड जिल्ह्यात  ७६३६७  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  २१९३० पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १२९ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १९९१७  जणांनी मात केली असून ३३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ६६१  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.