Corona-Virus

आज राज्यात ३,८२४ नवीन कोरोना रुग्णांची(Maharashtra corona update) नाेंद झाली आहे. शिवाय सलग तिसऱ्या दिवशी राज्यात कोराेना रुग्ण बरे हाेवून घरी जाणाऱ्या संख्येत वाढ हाेत आहे.

मुंबई : आज राज्यात ३,८२४ नवीन कोरोना रुग्णांची(Maharashtra corona update) नाेंद झाली आहे. शिवाय सलग तिसऱ्या दिवशी राज्यात कोराेना रुग्ण बरे हाेवून घरी जाणाऱ्या संख्येत वाढ हाेत आहे. आज राज्यात ५००८ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,४७,१९९ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.५२ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ७० कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,६८,१७२ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७१,९१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात गुरूवारी राज्यात ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूपैकी ठाणे मंडळ -२२, नाशिक-९, पुणे मंडळ- १७, काेल्हापूर-५, औरंगाबाद -५, लातूर-६, नागपूर-५ इतर राज्य -१ अशी नाेंद करण्यात आली आहे. आज नाेेंद झालेल्या ७० मृत्यूपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१५,०२,४२७ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,६८,१७२ (१६.२४ टक्के)नमुने पाॅझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४१,०५९ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ५,१३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.