रायगड जिल्ह्यामध्ये आज ३८८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात  आज ३८८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ८  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२५  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या १६३२९  झाली असून जिल्ह्यात ४४१  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात सोमवारी  कोरोनाचे ३८८  नवीन रुग्ण सापडले असून ३२५  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १९९  नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात १६६  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २  पनवेल ग्रामीण,  उरण , खालापूर, पेण , अलिबाग आणि  महाड येथील प्रत्येकी एका  व्यक्तीचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे .    

 पनवेल ग्रामीणमध्ये  ३३  उरण-१३, खालापूर-२८ , कर्जत-१२ , पेण-४४ , अलिबाग- ३३ , तळा-३ , रोहा-१९ , सुधागड-3, म्हसळा ४ महाड-२७ , पोलादपूर-३ अशा प्रकारे एकूण ३८८ रुग्ण  आढळले  आहेत . रायगड जिल्ह्यात  ५२७६१  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  १६३२९ पॉझिटिव्ह आल्या आहेत. १५४  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १२५७५ जणांनी मात केली असून ३३१३ रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ४४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.