राज्यात ३,८८० नव्या कोरोना रुग्णांची नोंद – ४,३५८ रुग्ण कोरोनामुक्त

आज राज्यात ३,८८० नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ४,३५८ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,७४,२५५ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत.

मुंबई : आज राज्यात ३,८८० नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ४,३५८ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,७४,२५५ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.१४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ६५ कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८४,७७३ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६०,९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात गुरुवारी ६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ६५ मृत्यूपैकी ४५ मृत्यू हे मागील४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू औरंगाबाद-४, नाशिक-१, नांदेड-१, परभणी-१, पुणे- १, सातारा-१ आणि ठाणे- १ असे आहेत.

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१९,३३,९५६ प्रयाेगशाळा नमुन्यांपैकी १८,८४,७७३ (१५.७९ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०६,९१४ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ४,०३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.