रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४०८ नवीन रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४०८ नवीन रुग्ण आढळले  असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४५  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १९७०६  झाली असून जिल्ह्यात ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 रायगड जिल्ह्यात बुधवारी  कोरोनाचे ४०८ नवीन रुग्ण सापडले असून ३४५  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २३९ नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात १८९  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८ ,उरण ४, पनवेल ग्रामीण , पेण , माणगाव , रोहा, महाड  आणि पोलादपूर  येथील एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .    

पनवेल ग्रामीणमध्ये ५० , अलिबाग २७ , खालापूर २५ , रोहा २३, माणगाव १९ , पेण १९ , उरण १४ ,  कर्जत १३ , महाड १२,  मुरुड ८ , सुधागड ३,  पोलादपूर २ , म्हसळा २ , श्रीवर्धन आणि तळामध्ये एक  रुग्ण आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात ६५५३४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १९७०६ पॉझिटिव्ह आल्या आहेत १५३   टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर १५६८०   जणांनी मात केली असून ३४८४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ५४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.