राज्यात ४,२५९ नव्या कोरोना रुग्णांची भर, ८० जणांचा मृत्यू

शनिवारी राज्यात ४,२५९ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ३,९४९ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,५३,९२२ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत.

मुंबई : शनिवारी राज्यात ४,२५९ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज राज्यात ३,९४९ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,५३,९२२ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.४६ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५० कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,७६,६९९ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७३,५४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शनिवारी ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ८० मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू यवतमाळ -३, अमरावती-२, नागपूर-२, नंदूरबार-२, बुलढाणा- १, चंद्रपूर-१, पुणे- १आणि ठाणे -१ असे आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१६,३८,३३६ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,७६,६९९ (१६.१३ टक्के)नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२५,६२३ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ४,५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.