corona positive

आज राज्यात(state) दिवसभरात १४, ९७६ कोरोनाबाधित(corona affected) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १३,६६,१२९ झाली आहे. तर आज राज्यात दिवसभरात ४३० मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा ३६, १८१वर पोहोचला आहे.

मुंबई: आज राज्यात(state) दिवसभरात १४, ९७६ कोरोनाबाधित(corona affected) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १३,६६,१२९ झाली आहे. तर आज राज्यात दिवसभरात ४३० मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा ३६, १८१वर पोहोचला आहे. आज राज्यात दिवसभरात १९, २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर हा ७८. २६ एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६०,३६३ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात १९ हजार २१२ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७८. २६ टक्क्यांवर गेले आहे. दरम्यान आज नोंद झालेल्या ४३० मृत्यूंपैकी २३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

आज राज्यात नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे परिमंडळ १४९, पुणे ५४, नाशिक ३५, कोल्हापूर ४९, औरंगाबाद ०२, लातूर मंडळ ३६, अकोला मंडळ ३६ ,नागपूर ६५ येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६, ९८, ०२४ नमुन्यांपैकी १३,६६,१२९ ( २०.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २१, ३५, ४९६ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २९, ९४७लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.