रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४३० नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड(raigad) जिल्ह्यात आज ४३०  नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५२  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २७५६४  झाली असून जिल्ह्यात ८०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ४३० नवीन रुग्ण सापडले असून २५२   जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २२५ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १७०  नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३, अलिबाग २,सुधागड २, खालापूर आणि पेण येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ५५ , अलिबाग ६४ , पेण ४९ ,  रोहा २२,  कर्जत २०, खालापूर १४, सुधागड १४ , उरण ९ , महाड ४ , तळा ३, माणगाव , मुरुड  आणि पोलादापूरमध्ये २  रुग्ण  आढळले  आहेत . रायगड जिल्ह्यात ९५९७८  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २७५६४ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १९८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २३०९७ जणांनी मात केली असून ३६५८ रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ८०९  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.