रायगड जिल्ह्यात ४४० नवे कोरोना रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ४४० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २०१४६  झाली असून जिल्ह्यात ५७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे  ४४० नवीन रुग्ण सापडले असून ५०० जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २११ नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात १५७  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १०, उरण ४, खालापूर ४, पेण ३, अलिबाग २ , मुरुड २, पनवेल ग्रामीण, रोहा , श्रीवर्धन आणि महाड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे . 

पनवेल ग्रामीणमध्ये ५४ , पेण ५० , अलिबाग ३०, खालापूर १९ , उरण ३६ , महाड ३३,  रोहा २५, श्रीवर्धन ८ , कर्जत १० ,  मुरुड १०, सुधागड ५ , पोलादपूर २ आणि म्हसळ्यामध्ये एक  रुग्ण आढळला  आहे.  रायगड जिल्ह्यात आजपर्यंत  २०१४६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून  जिल्ह्यात ५७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.