कल्याण डोंबिवलीत ४६७ नवे कोरोना रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ३१ हजार पार झाली असून आज नव्या ४६७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ४६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३१,००७ झाली आहे. यामध्ये ३६४२ रुग्ण उपचार घेत असून २६,६९४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ४६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ६६, कल्याण प.- १०५, डोंबिवली पूर्व १४७, डोंबिवली प- ११२, मांडा टिटवाळा – २७, मोहना -४, तर पिसवली येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १० रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, १ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.