corona virus

आज राज्यात(state) दिवसभरात १८, ३१७ कोरोनाबाधित(corona affected) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १३,८४, ४४६ झाली आहे. तर आज राज्यात दिवसभरात ४८१ मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा ३६, ६६२ वर पोहोचला आहे.

मुंबई :  आज राज्यात(state) दिवसभरात १८, ३१७ कोरोनाबाधित(corona affected) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १३,८४, ४४६ झाली आहे. तर आज राज्यात दिवसभरात ४८१ मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा ३६, ६६२ वर पोहोचला आहे.आज राज्यात दिवसभरात १९, १६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर हा ७८. ६१ एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,५९, ०३३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात १९ हजार १६३ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७८. ६१टक्क्यांवर गेले आहे.

दरम्यान आज नोंद झालेल्या ४८१ मृत्यूंपैकी २३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १२९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.नआज राज्यात नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे परिमंडळ १६९ पुणे ११४, नाशिक ३६, कोल्हापूर ५८, औरंगाबाद १६, लातूर मंडळ ३०, अकोला मंडळ ३० ,नागपूर २७ येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६७, ८५, २०५ नमुन्यांपैकी १३, ८४, ४४६ ( २०.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २१, ६१, ४४८ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २९, १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.