corona

आज राज्यात ४,९२२ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज कोराेना मृत्यूसंख्याही घटली असल्याचे समाेर आले आहे. आज राज्यात ९५ कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे.

मुंबई : आज राज्यात ४,९२२ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. तर आज कोराेना मृत्यूसंख्याही घटली असल्याचे समाेर आले आहे. आज राज्यात ९५ कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील कोराेनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,४७,५०९ झाली आहे. आज ५,८३४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १७,१५,८८४ कोराेनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज  एकूण ८२,८४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शनिवारी ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४० मृत्यू हिंगाेली -७, अकाेला-५ जळगाव-५, मुंबई-५, अहमदनगर-४, नागपूर-३, पुणे-३, अमरावती-२,औरंगाबाद-२, गाेंदिया-१, परभणी-१, सातारा-१ आणि ठाणे-१ असे आहेत.

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१२,०५,११८ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,४७,५०९ (१६.४९ टक्के)नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,६८५ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ५,८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या राज्यात ८२,८४९ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.