Corona-Virus-latest-image

आज राज्यात ४,९३० नवीन कोरोना(corona patients in maharashtra) रुग्णांची नोंद झाल्याने सोमवारच्या तुलनेत ही नोंद वाढल्याचे स्पष्ट झाले. राज्यात आज ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

मुंबई : आज राज्यात ४,९३० नवीन कोरोना(corona patients in Maharashtra) रुग्णांची नोंद झाल्याने सोमवारच्या तुलनेत ही नोंद वाढल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील दैनंदिन कोरोना नोंद वाढली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,२८,८२६ झाली आहे. आज ६,२९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १६,९१,४१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ८९,०९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात आज ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे पुणे -२२, जळगाव -४, यवतमाळ -४, मुंबई -३, सातारा -२, ठाणे -२, चंद्रपूर -२, नांदेड -१, नाशिक -१, अकोला -१ आणि सांगली -१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,१५,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२८,८२६ (१६.७५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५,३८,०८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.