राज्यात ४,९८१ नव्या कोरोना रुग्णांची नाेंद, बरे होणाऱ्यांचे वाढले प्रमाण

राज्यात आज ४,९८१ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी राज्यात कोराेना रुग्ण बरे हाेवून घरी जाणाऱ्या संख्येत वाढ हाेत आहे.

मुंबई : राज्यात आज ४,९८१ नवीन कोरोना रुग्णांची(corona patients in Maharashtra) नाेंद झाली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी राज्यात कोराेना रुग्ण बरे हाेवून घरी जाणाऱ्या संख्येत वाढ हाेत आहे. आज राज्यात ५,१११ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,४२,१९१ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.४५ % एवढे झाले आहे. आज राज्यात ७५ कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,६४,३४८ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७३,१६६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यातआज राज्यात ७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूपैकी ठाणे मंडळ -१८, नाशिक-७, पुणे मंडळ- १६, काेल्हापूर- ७, औरंगाबाद -०३, लातूर- ७, अकाेला -२, नागपूर-१४ अशी नाेंद करण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१४,४७,७२३ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,६४,३४८ (१६.२९ टक्के)नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४३,०९१ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ५,१०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.