Mamata Banerjee

तृणमूल काँग्रेसचे(trunmul congres) नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा(suvendu adhikari resignation) दिल्यानंतर २४ तासातच तृणमूलला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये(west bengal) राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. तृणमुल काँग्रेस पक्षामध्ये तर राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाल्यासारखे दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे(trunmul congres) नेते सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा(suvendu adhikari resignation) दिल्यानंतर  २४ तासातच तृणमूलला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. ते भाजपात जाणार असल्याचे समजते.

सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच तृणमूलच्या पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी  आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे त्यांनी राजीनामे पाठवले आहेत.

पक्षामध्ये सन्मान मिळत नाही. लोकांची कामं करता येत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचं या नेत्यांनी सांगितलं आहे.

यापूर्वी पक्षावर नाराज असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यानं तृणमूलमध्ये भूकंप आला. दुसरीकडे तृणमूलनं भाजपावर नेत्यांना फोडत असल्याचा आरोप करत निशाणा साधला आहे.