राज्यात दिवसभरात ५१,३५६ जण झाले कोरोनामुक्त, ५६,६४७ नव्या रुग्णांची नोंद

आज दिवसभरात ५१,३५६ कोरोना रुग्ण (corona patients in Maharashtra)बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

    मुंबई: आज राज्यात ५६,६४७ नवीन कोरोना रुग्णांची(Corona Patients In Maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७,२२,४०१ झाली आहे. आज दिवसभरात ५१,३५६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे.

    राज्यात आज ६६९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ६६९ मृत्यूंपैकी ३५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६६ मृत्यू, पुणे-५२, ठाणे-२३, नाशिक-२०, यवतमाळ-१३, नांदेड-९, भंडारा-८, हिंगोली-८, रायगड-६, जळगाव-४, लातूर-४, चंद्रपूर-३, नागपूर-३, सांगली-३, वाशिम-३, औरंगाबाद-२, सोलापूर-२, जालना-१, परभणी-१ आणि सातारा-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,२२,४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,९६,९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६८,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबईत दिवसभरात ३६२९ रुग्णांची नोंद
    दरम्यान मुंबईत दिवसभरात ३६२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६५५९९७ एवढी झाली आहे. तर ७९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आत्तापर्यंत १३२९४ मृत्यूची नोंद करण्यात आली.