Corona-Virus-photo

आज राज्यात ५,१८२ नवीन रुग्णांची नाेंद(corona patients in maharashtra) झाली आहे. पण कोराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेपेक्षा वाढ झाली असल्याचे समाेर आले आहे. आज राज्यात ११५ कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे.

मुंबई : आज राज्यात ५,१८२ नवीन रुग्णांची नाेंद(corona patients in maharashtra) झाली आहे. पण कोराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेपेक्षा वाढ झाली असल्याचे समाेर आले आहे. आज राज्यात ११५ कोराेना मृत्यूची नाेंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,३७,३५८ झाली आहे. आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७० % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ८५,५३५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात बुधवारी ११५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ११५ मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४७ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४७ मृत्यू पुणे -९, परभणी-७, नाशिक-५, यवतमाळ-५, औरंगाबाद-४,अमरावती-३, पालघर-३, वर्धा-३, नागपूर-२, नांदेड-१, हिंगाेली-१, रायगड-१, लातूर-१, सांगली-१ व सातारा-१ असे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१०,५९,३०५ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,३७,३५८ (१६.६१ टक्के)नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४८,१३७ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून ५,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.