रायगड जिल्ह्यामध्ये ५३५ नवीन कोरोना रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ५३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३९२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २२८८७  झाली असून जिल्ह्यात ११  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ५३५ नवीन रुग्ण सापडले असून ३९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २६७  नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात २१२ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३, उरण २, रोहा २ , पेण, अलिबाग, सुधागड  आणि महाड  येथील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .    

 पनवेल ग्रामीणमध्ये ५५ , पेण ४३, अलिबाग ४१, माणगाव ३८, रोहा ३१, महाड ३१, खालापूर २४, कर्जत २२, उरण १६, सुधागड १०, म्हसळा ७, श्रीवर्धन ३ आणि तळा येथे एक रुग्ण  आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात  ८०५३४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २२८८७  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १६१  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १८७२४ जणांनी मात केली असून ३४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ६८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.