बुलडाण्यामध्ये ५५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २४१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४९ व रॅपिड टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १७३ तर रॅपिड टेस्टमधील ६८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २४१ अहवाल निगेटीव्ह आहेत.

आज उपचारादरम्यान खामगांव येथील ५२ वर्षीय पुरूष व दे. राजा येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १९ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत ७४६५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ६६२ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ६६२ आहे. 

  आज रोजी ११४ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ७४६५ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १०६० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ६६२ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ३७१ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.