रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ६१५ नवीन रुग्ण

पनवेल : रायगड (raigad) जिल्ह्यात आज ६१५ नवीन रुग्ण आढळले असून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २९३१७  झाली असून जिल्ह्यात ८५६  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ६१५  नवीन रुग्ण सापडले असून ४१० जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ३०८ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २४८ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ६ ,उरण ५ , अलिबाग २, कर्जत , रोहा , श्रीवर्धन आणि म्हसळा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .
पनवेल ग्रामीणमध्ये ६० , पेण ९० , अलिबाग ५६ , माणगाव ३२ , खालापूर ३१  ,कर्जत २४ , रोहा २१ ,उरण १४ , महाड १३  , सुधागड ९ , श्रीवर्धन ८, पोलादपूर ७ आणि मुरुडमध्ये २ रुग्ण आढळले  आहे.  रायगड जिल्ह्यात १,०२,४२२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  २९,३१७ पॉझिटिव्ह आल्या आहेत २३६  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २४,३३९   जणांनी मात केली असून ४,१२२  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ८५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.