राज्यात दिवसभरात ६३,२८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८०२ रुग्णांच्या मृत्यूने वाढली चिंता

महाराष्ट्रात आज दिवसभरात (corona patients in maharashtra) ६३,२८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात (corona patients in maharashtra) ६३,२८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    आज राज्यात ६१,३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२४ इतके आहे.

    आज नोंद झालेल्या एकूण ८०२ मृत्यूंपैकी ४३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या१८६ मृत्यूपैकी पुणे-३८, औरंगाबाद-२७, नाशिक-२४, भंडारा-१९, नागपूर-१८, ठाणे-१७, चंद्रपूर-११, रायगड-६, सोलापूर-४, नांदेड-३, यवतमाळ-३, हिंगोली-२, जळगाव-२, जालना-२, नंदूरबार-२, परभणी-२, बीड-१, कोल्हापूर-१, उस्मानाबाद-१, पालघर-१, सातारा-१ आणि वर्धा-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ३८९७ रुग्णांची नोंद

    मुंबईत दिवसभरात ३८९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५२३६८ एवढी झाली आहे. तर ९० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आत्तापर्यंत मुंबईत १३२१५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.