रायगड जिल्ह्यामध्ये ६७० नवे कोरोना रुग्ण

पनवेल : रायगड(raigad) जिल्ह्यात आज ६७० नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २८७०२  झाली असून जिल्ह्यात ८३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७० नवीन रुग्ण सापडले असून ४७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ३०७ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २२६ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ७ , पनवेल ग्रामीण , पेण , अलिबाग , माणगाव , रोहा आणि सुधागड येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये  ९१ ,अलिबाग ९१, रोहा ५३ , माणगाव ४९, उरण ३१,खालापूर ३०, पेण २९ ,  कर्जत २१, सुधागड १६, महाड १६ , मुरुड ७ श्रीवर्धन ७ , तळा ६, पोलादापूर ३  आणि म्हसळ्यामध्ये एक रुग्ण  आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात ९९०४६  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २८७०२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २१२ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २३९२९  जणांनी मात केली असून ३९३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच जिल्ह्यात ८३९  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.