राज्यात दिवसभरात ६७,१६० नवे कोरोनाग्रस्त, ६७६ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

शनिवारी राज्यात ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची(corona patients in maharashtra) नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

    मुंबई: शनिवारी राज्यात ६७,१६० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,२८,८३६ झाली आहे. आज ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,९४,४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान शनिवारी राज्यात ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५,८६७ रुग्णांची नोंद
    दरम्यान मुंबईत दिवसभरात ५,८६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६,२२,१४६ एवढी झाली आहे. तर आज ७१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आत्तापर्यंत १२,७२६ मृत्यूची नोंद करण्यात आली.