corona

मुंबई: राज्यात ७०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच ही नोंद चार अंकात करण्यात आली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५,३५,३१५ झाली आहे. तर रोजच्या नोंदीच्या दुप्पट म्हणजे १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के एवढे झाले आहे.

मुंबई: राज्यात(state) ७०८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच ही नोंद चार अंकात करण्यात आली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५,३५,३१५ झाली आहे. तर रोजच्या नोंदीच्या दुप्पट म्हणजे १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दरम्यान राज्यात आज १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण १६५ मृत्यूंपैकी १०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू ठाणे -१२, पुणे -७, रत्नागिरी -७, नागपूर -५, सांगली -४, गडचिरोली -३, अमरावती -२, बुलढाणा -२, नांदेड -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत. तर आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख २३ हजार ७९१ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.