रायगड जिल्ह्यात ७२१ नवीन कोरोना रुग्ण,१४ जणांचा मृत्यू

पनवेल:रायगड(raigad) जिल्ह्यात आज ७२१ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५५  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३०,०३८  झाली असून जिल्ह्यात ८७०  जणांचा मृत्यू झाला आहे. आज अलिबागमध्ये प्रथमच एका दिवसात रुग्णांची शंभरी पार झाली आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२१ नवीन रुग्ण सापडले असून ४५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २९० नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २२३ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३, पनवेल ग्रामीण २ , खालापूर २ , कर्जत , पेण , मुरुड , माणगाव , रोहा , सुधागड आणि महाड   येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

आज अलिबागमध्ये १२३, पनवेल ग्रामीणमध्ये ६७ ,माणगाव ५४ , महाड ४९, उरण ३७, खालापूर ३७ , पेण ३२, कर्जत २८, रोहा २४ ,तळा १४, पोलादापूर १३, सुधागड १३,  मुरुड ३, श्रीवर्धन  आणि म्हसळ्यामध्ये २ रुग्ण आढळले आहेत.  रायगड जिल्ह्यात  १,०५, २३४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३०, ०३८ पॉझिटिव्ह आल्या आहेत १९६  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर २४७९४  जणांनी मात केली असून ४३७४  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ८७०  जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.