भारत बंदमुळे राज्यात आज एसटीच्या ७ हजार ४७० गाड्या रद्द, बस तोडफोडीचा अनुचित प्रकार नाही

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या तब्बल ७ हजार ४७० गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे एस.टी महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भाेसले यांनी सांगितले. तर या आंदाेलनात राज्यभरात एसटी ताेडफाेडीच्या काेणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबई: आज कृषी विधेयकाच्या(agricultural bill) विराेधात देशव्यापी आंदाेलन(protest) पुकारण्यात आले हाेते. महाराष्ट्र राज्यात देखील भारत बंद आंदाेलनाला काही शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर अनेक शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, अशा आंदाेलनावेळी वाहतूक व दळणवळणावर थेट परिणाम हाेताे.

याच पार्श्वभूमीवर, राज्यभर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या तब्बल ७ हजार ४७० गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे एस.टी महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भाेसले यांनी सांगितले. तर या आंदाेलनात राज्यभरात एसटी ताेडफाेडीच्या काेणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यभरात ३१ विभाग असून यात एसटी महामंडळाच्या १८ हजार ८८२ फेऱ्या नियमित हाेतात. आजच्या आंदाेलनामुळे केवळ राज्यभरात १० हजार ८६८ फेऱ्या प्रत्यक्षात झाल्या असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. तर ७,४७० फेऱ्या बंदमुळे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. तसेच इतर कारणांमुळे ५४४ फेऱ्या रद्द झाल्या असल्याचे सांगण्यात आले.