corona

राज्यात शुक्रवारी ३,९९४ नवीन कोराेना रुग्णांची नाेंद झाली आहे. राज्यात आज ७५ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात ४,४६७ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत.

मुंबई : राज्यात शुक्रवारी ३,९९४ नवीन कोराेना रुग्णांची(corona patients in maharashtra) नाेंद झाली आहे. राज्यात आज ७५ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७% एवढा आहे. आज राज्यात ४,४६७ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,७८,७२२ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९४.१७ % एवढे झाले आहे. आता राज्यातील काेरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८८,७६७ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६०,३५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात शुक्रवारी ७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूपैकी ४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू ठाणे-९, यवतमाळ-२, अमरावती-१, औरंगाबाद-१, जळगाव-१, नागपूर-१, सातारा-१ आणि साेलापूर-१ असे आहेत.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१९,९६,६२४ प्रयाेगशाळा नुमन्यांपैकी १८,८८,७६७ (१५.७४ टक्के)नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०३,८८६ व्यक्ती हाेम क्वारंटाईन असून ४,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.