राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ७७१ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू, ६६,१५९ नव्या रुग्णांची भर

आज राज्यात ६६,१५९ नव्या कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली आहे.तसेच ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू(corona deaths in maharashtra) झाला आहे.

  राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आज राज्यात ६६,१५९ नव्या कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली आहे.तसेच ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू(corona deaths in maharashtra) झाला आहे.राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३०१ सक्रिय रुग्ण आहेत.

  दरम्यान आज राज्यात ६८,५३७ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत ३७,९९,२६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८३.६९ टक्के इतका आहे.

  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६८,१६,०७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४५,३९,५५३ (१६.९३ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.सध्या राज्यात ४१,१९,७५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.तसेच ३०,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  आज नोंद झालेल्या एकूण ७७१ मृत्यूंपैकी ३८३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२३ मृत्यू, पुणे-१०५, नागपूर-२९, औरंगाबाद-२३, नंदूरबार-२३, , ठाणे-१७, भंडारा-६, कोल्हापूर-४, जळगाव-३, सोलापूर-३, हिंगोली-२, नांदेड-२, रायगड-२, जालना-१, नाशिक-१, पालघर-१ आणि सांगली-१ असे आहेत.

  मुंबईत मृत्यू वाढले 

  मुंबईत दिवसभरात ४१७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ८२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने मुंबईत मृत्यू वाढल्याची नोंद झाली आहे. मुंबईत आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६४४५८३ एवढी झाली आहे. तर आज आत्तापर्यंत १३०३६ मृत्यूची नोंद करण्यात आली.