राज्यात ७,७६० नवे रुग्ण, ३०० जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात ७,७६० नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४,५७,९५६ झाली आहे. राज्यात १,४२,१५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १६ हजार १४२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. 

राज्यात ३०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५६, ठाणे १३, भिवंडी निजामपूर मनपा १६, पुणे ३९, पिंपरी चिंचवड १७, जळगाव १२, कोल्हापूर ४०, औरंगाबाद ११, नागपूर १७ यांचा समावेश आहे. आज १२,३२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २,९९,३५६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २३,५२,०४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,५७,९५६ (१९.४७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४४,४४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४३,९०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.