सुधागड तालुक्यात आता ७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पाली : सुधागड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. बुधवारी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ७८ रुग्ण झाले आहेत. तर तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीत तब्बल १९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे पालिकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सुधागड तालुक्यात कोरोनाचे आत्तापर्यंत ४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे आणि ३६ जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. प्रशासन याबाबत योग्य नियोजन करून काम करत असल्याचे तहसीलदार रायन्नावर यांनी सांगितले.