महाडमधील दुर्घटनेत आत्तापर्यंत ८ जणांना बाहेर काढण्यात यश, एकाचा मृत्यू

महाड: महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली आहे. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता रक्ताची गरज भासणार आहे तरी कोणी रक्तदान करण्यास इच्छुक असेल तर त्यांनी महाडमधील जनकल्याण रक्तपेढी येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार एनडीआरएफची टिम पुणे येथून एक्सप्रेस हायवे मुंबई – पुणे खालापूर मुंबई – गोवा महामार्गावरून महाड येथे येण्याठी निघाली असून त्यांना लवकरात लवकर पोहोचणे शक्य व्हावे यासाठी संपूर्ण मार्ग ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या बिल्डिंगमधील आठ जणांना बाहेर काढले असून सात जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे.