जी उत्तर विभागात नवीन ८२ रुग्ण

मुंबई : धारावीत सोमवारी केवळ १२ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २५८५ वर पोहोचली आहे. तर केवळ ७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धारावी नियंत्रणात , दादरमध्ये रुग्णवाढ

मुंबई :  धारावीत सोमवारी केवळ १२ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २५८५  वर पोहोचली आहे. तर केवळ ७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर २२५१ कोरोनामुक्त झाले.

धारावी नियंत्रणात आली असली आता दादर-माहीम मधील रुग्णसंख्या काहीशी वाढतांना दिसते. दादर मध्ये आज ४१ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही १८७० इतकी झाली आहे.तर ४९९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये आज २९ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १७६२ इतकी झाली असून आज मृत्यूची नोंद झाली नाही. तर २४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.जी उत्तर मध्ये एकूण ८१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ८२ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही ६२१६ वर पोहोचली आहे.  त्यात धारावी २५८५,दादर १८७० तर माहीम १७६२ रुग्णांचा सामवेश आहे.तर धारावी मध्ये २२५१,दादरमध्ये १२९० तर माहीम मध्ये १४४७ असे एकूण ४९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.