राज्यात ८,४९३ नवे रुग्ण, २२८ जणांचा मृत्यू

मुंबई  : राज्यात ८,४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,०४,३५८ झाली आहे. राज्यात १,५५,२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून, २०  हजार 265 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे. 

राज्यात आज २२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली आहे. यामध्ये मुंबई ४०, नवी मुंबई ८, उल्हासनगर ६, रायगड १०, नाशिक ७, जळगाव ११, पुणे ३५, पिंपरी चिंचवड मनपा १९, सोलापूर ७, सातारा ११, लातूर १६ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २२८ मृत्यूंपैकी १७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू ठाणे जिल्हा ९, पुणे ६, मुंबई २, बुलढाणा १, कोल्हापूर १ आणि उस्मानाबाद १ असे आहेत. आज ११,३९१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,२८,५१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ७०.९  टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३२,०६,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,०४,३५८ (१८.८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५३,६५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.