राज्यात ८,९६८ नवे कोरोना रुग्ण, २६६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सोमवारी ८,९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,५०,१९६ झाली आहे. राज्यात १,४७,०१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २६६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १५ हजार ८४२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. 

राज्यात २६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४६, पुणे ४७, पिंपरी चिंचवड १३, नागपूर ५०, अन्य राज्य ३ यांचा समावेश आहे. आज १०,२२१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २,८७,०३० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२,९८,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,५०,१९६ (१९.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४०,४८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,००९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.